Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडले, तक्रार मागे घ्यायची असेल तर पन्नास हजार रुपये दे, संजय राणेची महिलेवर दादागिरी, गुन्हा दाखल

banner 468x60

मंडणगड तालुक्यात एका महिलेला धमकावत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी संजय बाबूराव राणे (वय ६०, रा. साईनगर, मंडणगड) याच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर २०२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी १.३० ते २.३० या सुमारास त्या नेहमीप्रमाणे आपल्या कामावर असताना संजय राणे त्यांच्या दुकानाजवळ आला. नगरपंचायतीत दिलेल्या तक्रारीबाबत महिलेनं विचारणा केली असता आरोपीने अश्लील शिवीगाळ सुरू केली.


“तू मला कोण विचारणारी? तक्रार मागे घ्यायची असेल तर पन्नास हजार रुपये दे,” अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.


याचवेळी आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिच्या अंगावर धाव घेत गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडले. हा प्रकार पाहून एका व्यक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यालाही अश्लील शिवीगाळ केली व, “माझ्यात पडू नका, नाहीतर तुम्हालाही संपवून टाकीन,” अशी धमकी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ७४, १३१, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *