चिपळूण : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

banner 468x60

चिपळूणमध्ये रेल्वेची धडक बसून तालुक्यातील पेढे येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी वालोपे रेल्वे स्थानकाजवळील फरशी तिठा पूल परिसरात घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश शंकर पानकर (वय ३१, रा. पेढे–पानकरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पानकर यांना वंदे भारत एक्स्प्रेसची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.मयत गणेश पानकर यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे पेढे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *