संगमेश्वर : महिलेवर बिबट्याचा हल्ला,“माझी मान बिबट्याच्या जबड्यात गेली असती”

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील शिवने सनगरेवाडी येथे महिलेवर बिबट्याने हल्ला केला. महिलेने धाडसाने प्रतिकार करत आपला जीव वाचवला. मात्र, हल्ल्यात महिला जखमी झाली.
जखमी साक्षी मंगेश पवार (वय ३८) या लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्या पायावर चार नखे लागली आहेत. पवार यांनी धाडसाने प्रतिकार करत जीव वाचला.


साक्षी पवार यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचे निर्देश येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याची चार नखे लागली आहेत. त्या जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. देवरुख वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी साक्षी पवार यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली.

जर मी स्वतःला जमिनीवर झोकून दिले नसते तर बिबट्याची उडी माझ्या अंगावर आली असती आणि कदाचित याच क्षणी माझी मान बिबट्याच्या जबड्यात गेली असती. ही घटना म्हणजे माझ्यासाठी दुसरा जन्मच आहे असे साक्षी पवार यांनी सांगितले .


दिवसागणिक बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *