Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : घरफोडी केली सोबतच दुचाकीही घेऊन पळाला

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्याने रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घराच्या आवारात उभी केलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते २२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी रोजिना इरफान जुवळे (४९, रा. कडवई उभीवाडी) या आपल्या घराला कुलूप लावून गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.


चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली ६० हजार रुपयांची रोकड आणि २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच, फिर्यादी यांचे शेजारी राहणारे साक्षीदार मुराद अली काझी यांची होंडा ॲक्टिवा ही दुचाकी फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात उभी होती ती चोरून नेली .


चोरट्याने घरात प्रवेश केल्यानंतर कपाटात असलेली या गाडीची चावी शोधून काढली आणि त्या चावीच्या सहाय्याने घराबाहेर उभी केलेली मुराद अली काझी यांची ५० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची होंडा ॲक्टिवा चोरून नेली. सोन्याचे दागिने आणि दुचाकी मिळून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
ही चोरीची घटना लक्षात आल्यानंतर रोजिना जुवळे यांनी २३ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *