जयगड : दोन सेवानिवृत्त शिक्षकांची ऑनलाईन 7 लाख 56 हजार 514 रुपयांची फसवणूक

banner 468x60

रत्नागिरी जयगड येथील दोन सेवानिवृत्त शिक्षकांना अज्ञाताने ऑनलाईन पध्दतीने तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा फसवणूकीचा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ते १७ ऑक्टोबर रोजी या कालावधीत घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, नासिर अब्दुल्ला बावडे (वय ६१) रा. जयगड अकबर मोहल्ला, रत्नागिरी यांनी जयगड पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली आहे. ऑक्टोबर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अज्ञाताने फिर्यादींच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदखोल केंद्र व्हॉटस अॅप ग्रुपवर बँक ऑफ इंडिया संबंधित माहितीची बनावट पीडीएफ फाईल व एपीके फाईल पाठवली होती. ही फाईल फिर्यादी नासिर बावडे यांनी डाउनलोड करुन पाहिली.

त्यानंतर काही वेळाने ती फाईल पाठवणाऱ्या अज्ञात संशयिताने फिर्यादीच्या मोबाईलचा अॅक्सेस घेवून बँक ऑफ इंडिया पगार खाते व बचत खात्यातून ६ लाख ८५ हजार ५१४ रुपये

आणि साक्षीदार शिला शंकर वाघधरे (रा.अंबूवाडी) यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ७१ हजार अशी एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची रक्कम अनोळखी खात्यात वळवून या दोघांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *