Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : कोकण कट्टा न्यूजच्या बातमीची दखल, “माझं दापोली” गार्डनच्या शेजारी तलावाचा भाग त्वरित नेटने बंद करण्याच्या सूचना

Screenshot

banner 468x60

दापोली येथील “माझं दापोली” गार्डन शेजारी असलेल्या तलावामुळे लहान मुलांसाठी गंभीर सुरक्षा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर बातमी कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी दिली. याची दखल घेत दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका साधना बोत्रे यांनी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना केल्यात.

https://www.instagram.com/reel/DRNBiYQkhvi/?igsh=MWZ4Zmpycnl2MTNiZQ==

banner 728x90 banner 728x90

नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचित केले आहे की, गार्डनमधील तलावाचा धोकादायक भाग जाळी (नेट) लावून त्वरित बंद करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा नागरिक बुडण्याच्या अपघातापासून सुरक्षित राहतील.तलावाजवळ सूचना फलक (Information Board) लावण्याचे काम देखील त्वरित सुरू करावे. या फलकांमध्ये नागरिकांना सुरक्षिततेसंबंधी माहिती देण्यात येईल आणि तलावाजवळ फिरताना दक्ष राहण्याचे संदेश दिले जातील.

नगरपंचायताने दिलेल्या या उपाययोजनांमुळे गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि गार्डनचे सौंदर्य जपण्यास देखील मदत होईल. कोकण कट्टा न्यूजच्या प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्डन आणि तलावाच्या परिसरात या सुरक्षा उपाययोजनांची सुरुवात त्वरित होणार आहे. नागरिकांनी या सूचना पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *