खेडमध्ये 10 प्रभागांत 82 अर्ज, नगराध्यक्षपदासाठी 8 दावेदार, भाजपकडून वैभवी खेडेकर यांनी देखील भरला अर्ज

Screenshot

banner 468x60

खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरंभापासूनच रंगलेल्या राजकीय रणसंग्रामात नामनिर्देशनाचा अंतिम दिवस गजबजून गेला. दिवसभरात मोठ्या संख्येने उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामुळे बहुकोनी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल ८२ अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार मैदानात उतरल्यानंतर खेडच्या राजकारणात चुरस कमालीची वाढल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, उद्धव ठाकरे गट आणि स्वतंत्र उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल केल्याने प्रत्येक प्रभागात तिरंगी, चौकोनी तर काही ठिकाणी पंचकोनी लढत होण्याची शक्यता आहे. खेड नगरपरिषद सदस्य पदांसाठी देखील शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एकूण ८२ उमेदवारांनी विविध पक्षांतून तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यापैकी शिवसेना पक्षाचे 27, भाजपचे 15, अपक्ष 15, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 6, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे 2 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 13

banner 728x90 banner 728x90

अर्ज दाखल झाले आहेत. खेड नगरपरिषदेमध्ये एकूण 10 प्रभाग असून, या 10 प्रभागामधील 20 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र या 20 जागसाठी शहरातून तब्बल 82 उमेदवार मैदानात उतरणार आहेत. मात्र, यापैकी कोणते उमेदवार अंतिम रित्या स्पर्धेत राहणार हे 21 नोव्हेंबर रोजी छाननी आणि अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती प्रत्यक्षात टिकून राहते का? अथवा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी मात्र या निवडणुकीत एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे. छाननी आणि त्यानंतर जाहीर होणारी अंतिम यादी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षपदासाठी ८ दावेदारांचा मुकाबला नगराध्यक्षपदासाठीही काल शेवटच्या दिवशी मोठी धावपळ झाली. शिवसेनेच्या माधवी बुटाला यांचे दोन अर्ज, भाजपच्या वैभवी खेडेकर, उद्धव ठाकरे गटाच्या सपना कानडे, शिवसेनेच्या तेजल चिखले, वंचित बहुजन आघाडीच्या सीमा जाधव तसेच कौसर मुजावर यांच्या अर्जामुळे या पदाची स्पर्धा अत्यंत रोमहर्षक होणार आहे. छाननीकडे संपूर्ण खेडचे लक्ष एकूण ८२ नगरसेवक आणि ८ नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार असून कोणाचे अर्ज ग्राह्य धरले जातील आणि कोण रिंगणाबाहेर जाईल याची उत्सुकता सर्वच पक्षांना लागली आहे. अंतिम

उमेदवारीची यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला गती मिळणार असून प्रभागनिहाय समीकरणेही अधिक स्पष्ट होणार आहेत. खेड नगरपरिषदेची ही निवडणूक अनेक गट-तटांमध्ये विभागलेल्या राजकीय वातावरणात होत असल्याने निकाल कोणत्या दिशेने झुकेल याबाबत तकर्वांना उधाण आले आहे. मात्र सध्या तरी खेड शहर निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात अक्षरशः पेटलेले दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *