दापोली : पोलिसांच्या तत्परतेमुळे, हरवलेली महिला आणि मुलगा सुरक्षित

Screenshot

banner 468x60

गेल्या महिनाभरापासून दापोलीतून बेपत्ता असलेली महिला आणि मुलगा सुरक्षित घरी आले आहेत. श्रुती सुरज निवळकर (वय 29) व तिचा मुलगा समर्थ सुरज निवळकर (वय 2 वर्ष 9 महिने) राहणार उर्मिला अपार्टमेंट उदयनगर . हे दोघे हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

दापोली पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आज दोघेही सुरक्षितपणे सापडले असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांच्या तत्परतेमुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे. मात्र यामध्ये महिलेने म्हटलंय त्या स्वतः इच्छेनुसार माहेरी आईकडे जाणार आहेत आणि त्यांचे पती सुरज संजय निवळकर यांना याबाबत सांगण्यात आले आहे. पोलीसांनी सर्व संबंधितांचा जबाब नोंदवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *