रत्नागिरीमध्ये आगामी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने नगरसेवक पदाकरिता आपल्या नऊ (९) उमेदवारांची नावे आज अधिकृतपणे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही नावे घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत, शिवसेना रत्नागिरी जिल्हा निवडणूक प्रभारी यशवंत जाधव, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, विलास चाळके, आणि बंड्या साळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार प्रभागानुसार
प्रभाग २ निमेश नायर
प्रभाग ३ |राजन शेट्ये
प्रभाग ५ सौरभ मलुष्टे
प्रभाग ७ गणेश भारती
प्रभाग ७ श्रद्धा हळदणकर
प्रभाग ८ बाळू साळवी
प्रभाग ९ विजय खेडेकर
प्रभाग १३ सुहेल साखरकर
प्रभाग १३ आफरीन होडेकर
भाजपला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत
प्रभाग १ नितीन जाधव
प्रभाग १० राजू तोडकर
प्रभाग १० मानसी करमरकर
प्रभाग ११ समीर तिवरेकर
प्रभाग ११ सुप्रिया रसाळ
प्रभाग १५ वर्षा ढेकणे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















