Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : बसस्थानकासमोरील मोबाईलचे दुकान फोडून नेणाऱ्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी

banner 468x60

संगमेश्वर बसस्थानकासमोरील मोबाईलचे दुकान फोडून सुमारे ५१,४९९ रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठाणे येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

banner 728x90 banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील (वय २३, रा. कर्जत, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश तुकाराम आंबवकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्या मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून तीन मोबाईल, एक राऊटर, पॉवर बँक, ब्ल्यूटूथचा हेडफोन, स्मार्टवॉच असा एकूण ५१,४९९ रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

ही चोरी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी उघड झाली होती. या चोरीप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक तपास पथक तयार केले होते. पथकाकडून गुन्ह्यातील घटना स्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे हा गुन्हा शंकर अर्जुन पाटील उर्फ शंकर साळुंखे याने केल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती. तो सध्या

शहापूर (जि. ठाणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाला आरोपीच्या शोधाकरिता शहापूर व मुरबाड येथे पाठविण्यात आले होते. पथकाने त्याला दिनांक ११ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला १८,९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हेडकॉन्स्टेबल विजय आंबवकर, विवेक रसाळ, दीपराज पाटील, अतुल कांबळे यांनी ही कामगिरी पार पाडली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता एक महिन्यापूर्वी राजापूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. राजापूर पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडी सारखे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *