रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक; तिसऱ्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज

banner 468x60

रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवशी उमेदवारांनी पाठ फिरवल्या नंतर तिसऱ्या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या 32 नगरसेवकांच्या जागांसह थेट नगराध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 17 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी मात्र दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्या रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी बावानी मतीन याकुबसत्तार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. प्रभाग क्र.३ जागा ब आरक्षण- सर्वसाधारण साठी त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. तर बावानी हीना मतीन यांनी देखील याच प्रभागातून आपली उमेदवारी दाखल केली. त्यांनी प्रभाग क्र.३ जागा ब आरक्षण- सर्वसाधारण साठी आपली उमेदवारी दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *