चिपळूण : डॉ. मृणाली पौरास जाधव यांनाडीएनबी मेडिसिन पदवी प्राप्त

banner 468x60

सावर्डे येथील डॉ. मृणाली पौरास जाधव यांनी एमबीबीएस (वैद्यक शाखेची पदवी) नंतर डीएनबी मेडिसिन (राष्ट्रीय वैद्यक मंडळ पदव्युत्तर वैद्यक शाखा) ही पदवी उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. मनोहर यादव, सुनील सीताराम जाधव, ऍड. विश्वजीत मनोहर यादव, उर्मिला मनोहर यादव आणि स्नेहल सुनील जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.


डॉ. मृणाली यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण शासन वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पूर्ण केले. पुढे डीएनबी मेडिसिन ही पदवी त्यांनी पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयात शिक्षण घेत यशस्वीरीत्या पूर्ण केली.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *