रत्नागिरी तालुक्यातील खरवते खोपर्डे येथे दुचाकी दरीत कोसळून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार, 11 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. संजय सखाराम सनगरे (वय 60, कोतवडे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
तर सूर्यकांत जयदेव वारेकर (वय 60, आरेवारे, रत्नागिरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत वारेकर हे कोतवडे येथून आपला कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून खोपर्डेच्या दिशेने जात होते. त्यावेळी वाटेत भेटलेल्या संजय सनगरे यांनी लिफ्ट मागितली.
मात्र खरवते येथील उतारावर सूर्यकांत यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि बारीक खादीवरून दुचाकी घसरली. दुचाकीसहीत दोघे 20 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात संजय सनगरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वारेकर यांच्या हाताला दुखापत झाली. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















