Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर

banner 468x60

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केलेल्या या यादीत १२ उमेदवारांचा समावेश असून त्यापैकी ८ महिला उमेदवार आहेत.

नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन काही दिवस उलटले असले, तरी गेल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. कारण प्रमुख पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, महाविकास आघाडीने पहिली यादी जाहीर करताच निवडणूक रणशिंग फुंकले आहे.


आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, उर्वरित नगरसेवक पदांच्या तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे.
तसेच, महाविकास आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही (मनसे) सोबत घेतले असून दोन जागा मनसेला देण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आय. काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच त्याचाही निर्णय होईल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

⸻

📋 महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी :
1️⃣ सतीश शेटे – वार्ड क्र. 3
2️⃣ रिद्धी घोरपडे – वार्ड क्र. 4
3️⃣ कोमल जांगली – वार्ड क्र. 5
4️⃣ निशा शेटे – वार्ड क्र. 7
5️⃣ प्रगती वराडकर – वार्ड क्र. 8
6️⃣ रिया गुहागरकर – वार्ड क्र. 9
7️⃣ वैशाली मालप – वार्ड क्र. 10
8️⃣ रूपा खातू – वार्ड क्र. 12
9️⃣ राज विखारे – वार्ड क्र. 16
🔟 रिया मोरे – वार्ड क्र. 17

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *