Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पालगड हायस्कूलचा वेद चव्हाण प्रथम

banner 468x60

ब्रिलियन्ट कॅरियर अकॅडमी, दापोली व रोटरी क्लब, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर, पालगड हायस्कूलचा विद्यार्थी वेद प्रमोद चव्हाण (इयत्ता 10 वी) याने इयत्ता 8 वी ते 10 वी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

banner 728x90 banner 728x90

तसेच अन्वय प्रसाद पावशे (इयत्ता 6 वी) याला इयत्ता 5 वी ते 7 वी गटात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा विद्या प्रसारक मंडळ, मराठा मंदिर, दापोली येथे पार पडली. वेद चव्हाण याने “मी पर्यावरण रक्षक” या विषयावर प्रभावी विचार मांडून परीक्षक व श्रोत्यांची मनं जिंकली. तर अन्वय पावशे याने “विज्ञान आणि तंत्रज्ञान — शाप की वरदान” या विषयावर आपले विचार मांडले.

दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेचे ज्येष्ठ शिक्षक दत्तप्रसाद गुरव सरांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास ₹2,000 रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक ट्रॉफी, तर उत्तेजनार्थ विजेत्यास प्रमाणपत्र, भेटवस्तू व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्या प्रसारक मंडळ, दापोलीचे अध्यक्ष सुनिल दळवी, ब्रिलियन्ट कॅरियर अकॅडमीचे अध्यक्ष राजपुरे, रोटरी क्लब दापोलीचे अध्यक्ष विनोद तलाठी, अकॅडमी प्रमुख संदीप खोचरे,

. लीना खोचरे, कुणाल मंडलिक, शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मांडवकर, तसेच प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश तोळसकर व राजकुमार यादव यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी, पालगडचे अध्यक्ष शरद रावजी केळकर, उपाध्यक्ष अशोक करंदीकर, मुख्याध्यापक प्रसाद पावशे, तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *