आंजर्ले : किनाऱ्यावर मोटार चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मुरुड येथे हुल्लडबाजी करत समुद्रकिनाऱ्यावर वाळू व उथळ पाण्यात भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवणाऱ्या दोन चालकांवर दापोली पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

https://www.facebook.com/share/r/1QLB4YE8oe/?mibextid=wwXIfr

या दोन्ही घटनांमध्ये किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी सांगितले. मुरुड समुद्रकिनारी ३ नोव्हेंबरला दुपारी संशयित तुकाराम सोन्याबापू पवार (रा. विजयनगर, देवळाली कॅम्प, नाशिक) यांनी त्यांची मोटार (एम.एच-१५ केजी-४७३७) किनाऱ्यावर वेगाने चालवली. याबाबत पोलिसपाटील समीर संजय बाळ यांनी दापोली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून संबंधित पर्यटकांवर गुन्हा दाखल केला आहे.


दुसरी घटना आंजर्ले समुद्रकिनारी ५ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. संशयित दिनेश बाबस्वान चव्हाण (वय ४०, मूळ रा. तातवडे, पिंपरी-चिंचवड, पुणे) याने मोटार (एमएच-१४- केडब्ल्यू-८५०२) भरधाव वेगात किनाऱ्यावरील वाळूत आणि उथळ पाण्यात चालवली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल राजू मोहिते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रकिनारी वाहनांची बेफिकीर धाव, पर्यटकांच्या जिवाला धोका आणि पर्यावरणीय ताण वाढवणारी असल्याने, पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. किनाऱ्यावर वाहन चालविणे पूर्णतः बंद असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *