दापोली : ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दापोलीत राष्ट्रगीत गान कार्यक्रम

Screenshot

banner 468x60


‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दापोली येथील प्रसिद्ध आझाद मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकसुरात संपूर्ण वंदे मातरम्चे गायन करून देशभक्तीचा जयघोष केला.

banner 728x90

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, नगराध्यक्षा कृपा घाग, तसेच विविध विभागांचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविकांनीही यावेळी सहभागी होऊन वंदे मातरम्चे गायन केले. या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *