Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

खेड : लोटे गुरुकुल’ प्रकरणात भगवान कोकरे महाराज, प्रितेश कदम यांना जामीन मंजूर

banner 468x60

खेड लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम या दोघांना खेड न्यायालयाने गुरुवारी (दि.६) जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात दोघांना दि.१४ ऑक्टोबर रोजी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत संशयित भगवान कोकरे महाराज यांच्या वतीने ऍड. मिलिंद जाडकर, तर संशयित प्रितेश कदम यांच्या वतीने ऍड. भारत सोनुले यांनी जामीनासाठी युक्तिवाद केला.

सरकारी पक्षाने दोघांच्या जामिनास तीव्र विरोध दर्शवून आपले मुद्दे मांडले. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. लोटे येथील वारकरी गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्यावर POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *