जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सामान्य परिस्थितीतील विद्यार्थीही असामान्य यश मिळवू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण धारूर शहरातील ज्योती पवार यांनी घालून दिले आहे. टेम्पो चालकाची कन्या असलेल्या ज्योती पवार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या प्रतिष्ठित विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, त्यांची नियुक्ती रत्नागिरी येथे झाली आहे.
धारूरसारख्या डोंगराळ आणि मर्यादित शैक्षणिक सुविधा असलेल्या भागातून आलेल्या ज्योती यांनी हे यश मिळवल्याने केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण धारूर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. कसबा भागातील रहिवासी असलेले त्यांचे वडील भागवत पवार हे टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे.
महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक पदासाठी जून २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत हजारो उमेदवारांमधून ज्योती पवार यांनी गुणवत्ता सिद्ध करत यश मिळवले आणि त्यांची रत्नागिरी येथे विद्युत सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील, विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि प्रशासकीय सेवेत स्थान मिळवण्याची प्रेरणा देणारे ठरले आहे.
ज्योती पवार यांनी आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्याला, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या सातत्यपूर्ण व अथक प्रयत्नांना दिले आहे. जय किसान गणेश मंडळासह धारूर शहरातील विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी नागरिक आणि नागरिकांनी ज्योती पवार यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. धारूर परिसरातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने मोठे यश मिळवून प्रशासनात आपले स्थान पक्के केल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या अभिमानाला उधाण आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*