हर्णे–राजवाडी येथील जयंत दुबळे (वय 80) या वृद्धाने जागा विक्रीचे 40 लाख रुपये न मिळाल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास जयंत दुबळे हे आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे समजताच अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, पुढील तपासादरम्यान पोलिसांना मृताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली.
त्यात त्यांनी संदेश कदम आणि अमोल गुरव या दोघांनी जागेच्या विक्रीतील उर्वरित 40 लाख रुपये दिले नाहीत, त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना होऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















