दापोली : “या” माथेफिरूने केली तोडफोड; 4 दुचाकी, 3-4 कारचे नुकसान

banner 468x60

दापोली शहरातील पोस्ट गल्ली परिसरात एका अज्ञात माथेफिरूने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी(२ नोव्हेंबर) रात्री उशिरा घडली असून, यात चार दुचाकी आणि तीन ते चार चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रात्री साधारण १ ते ३ च्या दरम्यानची घटना आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित माथेफिरूने दारूच्या नशेत कारच्या काचा फोडल्या तसेच गाड्यांवर मोठे दगड आणि चिरा मारून हानी केली. या तोडफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्याने हे का केल याबाबतचा सविस्तर तपास दापोली पोलीस करत आहे गाड्यांवर मोठे दगड आणि चिरा घातल्याने गाड्यांच प्रचड नुकसान केल आहे.

हा माथेफिरू नेपाळी रहिवाशी असून दापोलीत एका चाईनीजच्या दुकानात काम करतो अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित माथेफिरूला ताब्यात घेतले असून त्याने हे कृत्य नेमके का केले याबाबतचा तपास सुरू आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे.दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण असून रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दापोलीत रस्त्यावर जे गाड्या पार्किंग करतात त्यांच्या मनात देखील भीती निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *