रत्नागिरी : मजगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मजगाव येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार ३९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली, अम्मार नासिर कालसेकर (२६, रा. मजगाव मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) असे गुळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

banner 728x90 banner 728x90

शुक्रवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना त्याने घराच्या माळ्यावर जाउन लाकडी पेटीवर चढून घराच्या वाश्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने त्याचे नातेवाईक घरी परतले असता त्यांना अम्मार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अम्मारला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *