महाड-विन्हेरे मार्गावर दापोली एसटी आणि कारची समोरासमोर धडक; सहा महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच!

banner 468x60

महाड-विन्हेरे राज्य मार्गावर कुरले गटातील हॉटेल हिल टाऊनजवळ बुधवारी सायंकाळी सुमारास पाच वाजताच्या सुमारास एसटी बस (MH-06-AS-8483) आणि मारुती एस-एक्स-4 कार (MH-05-AX-3431) यांच्यात भीषण समोरासमोर धडक झाली.

banner 728x90

दापोलीहून पुण्याकडे जाणारी पिंपरी चिंचवड आगाराची एसटी बस आणि समोरून येणारी कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

गेल्या मे महिन्यापासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, ऑक्टोबर महिना संपत आला तरीही अपघातांना आळा बसलेला नाही. या रस्त्यावरील धोकादायक वळणं, वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि रस्त्याची दुरवस्था हेच अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *