दापोली : गावतळेत बीएसएनएलची रेंज गायब

banner 468x60

दापोली तालुक्यातील गावतळे गावातील बीएसएनएल टॉवरची रेंज गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खालावली असून, गावातील मोबाईल नेटवर्कचा ताण नागरिकांवर आला आहे. मोबाईलवर कॉल केल्यास पूर्ण न होता कट होतो, तर इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना संवाद साधणं, ऑनलाईन कामं करणं कठीण झालं आहे.

शिक्षण, बँकिंग, सरकारी कामकाज, आरोग्यसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट आवश्यक असताना गावतळे येथे नेटवर्क न मिळाल्याने विद्यार्थी, शेतकरी, तसेच व्यावसायिक वर्गात संताप आहे. ग्रामस्थांनी अनेकदा बीएसएनएल कार्यालयात तक्रारी दाखल केल्या असूनही अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई झालेली नाही.

वारंवार नेटवर्क गायब होते, कॉल लागत नाही, तर इंटरनेट तर पूर्णपणे ठप्प होते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून मिळत आहे. गावकऱ्यांनी बीएसएनएलने तातडीने तांत्रिक पाहणी करून टॉवरची क्षमता वाढवावी, अशी मागणी केली आहे; अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *