सोशल मीडियावरील मैत्री किती घातक ठरू शकते, याचे प्रत्यंतर नागपुरात घडलेल्या एका घटनेत आले आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत नागपुरातील २६ वर्षीय महिलेला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याप्रकरणी चिपळूणमधील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव फरहान उर्फ जलालुद्दीन अबुल रफिक नाडकर (रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आहे. पीडित युवतीची मार्च महिन्यात इन्स्टाग्रामवर फरहानशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि काही दिवसांतच फरहानने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
पुढे त्याने तिला व्हिडिओ कॉलसाठी प्रवृत्त करून त्या कॉलचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले.
यानंतर त्याने तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेकडून मार्चपासून विविध बँक खात्यांमधून १ लाख २० हजार रुपये वसूल करण्यात आले. तरीदेखील आरोपी आणखी पैशांची मागणी करत राहिला.
शेवटी त्रस्त झालेल्या पीडितेने सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणी व आयटी अॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















