Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दाभोळ : दिवाळी सांजने दाभोळ उजळले, ‘गंध स्वरांचा’ संगीत मैफिलीने मंत्रमुग्ध

banner 468x60

दिवाळीच्या शुभप्रसंगी दाभोळ गाव खऱ्या अर्थाने स्वरांच्या झंकाराने उजळून निघाले. सागरपुत्र विद्या विकास संस्था आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोळ येथे नुकतीच ब्रह्मनाद ग्रुप निर्मित ‘गंध स्वरांचा’ संगीत मैफल रंगली. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने दाभोळच्या सांस्कृतिक परंपरेला एक नवे सुरेल पान जोडले.

ब्रह्मनाद ग्रुपचा दाभोळमधील हा पहिलाच प्रयत्न असून, संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने तो यशस्वी ठरला. संगीतप्रेमी लोकांना एकत्र आणणे, त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळवून देणे आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे हा या मैफिलीमागचा मूळ हेतू होता. दिवाळीच्या आनंदात संगीताचा सुवास मिसळत गंध स्वरांचा या उपक्रमाने दाभोळच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवा अध्याय लिहिला. संगीत, कला आणि भावनांचा हा अद्भुत संगम अनुभवताना प्रत्येक श्रोता मंत्रमुग्ध झाला आणि खरोखरच असं वाटलं — “दिवाळी सांजने दाभोळ उजळले!”

कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. ज्येष्ठ नागरिक अनंत महाकाळ गुरुजी, किशोर तांबडे, नाना शिगवण आणि किरण फडणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मंचावर सुरेल वातावरणाची निर्मिती झाली. अजित जोशी यांनी सादर केलेल्या “नमन नटवरा विस्मयकारा” या नांदीने मैफिलीची सुरुवात झाली आणि त्यानंतर गीतांचा अविरत प्रवाह सुरू झाला.


एकापेक्षा एक सुंदर गीतांच्या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली — ओंकार स्वरूपा, अबीर गुलाल उधळीत रंग, तुझे नाम आले ओटी, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो, सखी मंद झाल्या तारका, या भवनातील तीत , वृंदावनी वेणु वाजे, प्रथम तुझं पाहता, कानडा राजा पंढरीचा, गणपती गणराज, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, नाम तुझे, संत भार पंढरीत, सुखवी तया, मन माझे भुलले, दत्तनामाचा महिमा, अशा भावस्पर्शी गीतांनी वातावरण भारावून गेले. शेवटी जातो जिथे जिथे मी या भैरवीने मैफिलीची सांगता झाली.


या मोहक संगीत प्रवासात डॉ. आनंद गोंधळेकर, अजित जोशी, डॉ. दिलेश मुरकर, संदेश कुलाबकर, महेश सोमण, मधुकर गुरव आणि कु. श्रावणी गोंधळेकर यांनी आपल्या अप्रतिम गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
संगीताला समर्थ वाद्यसाथ मिळाली — ऑर्गन/संवादिनीवर महेश सोमण आणि नाना कुलाबकर, तबल्यावर साध. मकरंद सोमण, पखवाद साथीसाठी मंदार सोमण आणि संदेश कुलाबकर, तर तालवाद्यसाठी नाना कुलाबकर आणि संदेश कुलाबकर यांनी योगदान दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. आनंद गोंधळेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *