चिपळूण : कळंबस्ते रेल्वे फाटकात पुन्हा तांत्रिक बिघाड

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक पुन्हा तांत्रिक बिघाडामुळे अडकले होते. मंगळवार सुमारास (सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास) हा फाटक अडकल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जॅम निर्माण झाला.

स्थानिकांचे आणि वाहनचालकांचे मोठे गैरसोय होत असून, तातडीने दुरुस्तीची मागणी केली जात आहे. शौकत मुकादम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, जर दुरुस्ती अभावी अपघात घडला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोकण रेल्वे प्रशासनाची राहील.

मुकादम पुढे म्हणाले की कळंबस्ते येथे रेल्वे फाटक असल्याने उड्डाण पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे, पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही. या फाटकामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *