Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : चोरट्या वाळूने भरलेला डंपर ग्रामस्थांनी अडवून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिला

banner 468x60

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत सक्शन पंपाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या प्रकाराकडे स्थानिक महसूल विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी असून, आता ग्रामस्थांनीच या विरोधात पाऊल उचलले आहे.

banner 728x90 banner 728x90


आज (२० ऑक्टोबर) सकाळी सुमारास देहेण गावात आंजर्ले ते कादिवली रस्त्यावरून जात असलेला वाळूने भरलेला कर्नाटक क्रमांकाचा एक डंपर ग्रामस्थांनी थांबवून ठेवला. सदर डंपरमध्ये चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे गावकऱ्यांनी त्वरित महसूल विभागाला व पत्रकारांना माहिती दिली.

पत्रकारांनी या घटनेची माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी अंभोरे यांना घटनास्थळी पाठवले. जवळपास ३ तासांनंतर महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि डंपरची तपासणी करत पंचनामा केला. त्यानंतर सदर डंपर ताब्यात घेत दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे.

तहसीलदार अर्चना बोंबे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “डंपरवर दंडात्मक कारवाई दिवाळीच्या सुटीनंतर करण्यात येईल. पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल.”

दरम्यान, आंजर्ले खाडीत मागील अनेक महिन्यांपासून पावसाळ्याच्या काळातही सक्शन पंपाच्या सहाय्याने शेकडो ब्रास वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असूनही महसूल विभाग किंवा इतर संबंधित यंत्रणांकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, “बेकायदा वाळू उपशाला कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे महसूल राज्यमंत्री हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी असूनही त्यांच्या तालुक्यातच सर्रास वाळू उपसा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्य सरकारकडून तहसीलदारांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, बेकायदा वाळू उपसा आढळल्यास कारवाई करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. मात्र प्रत्यक्षात याचे पालन होताना दिसत नसल्याने, महसूल खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *