Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

खेड : भोस्ते मोहल्यात जातो सांगून घरातून निघाला 9 ऑक्टोबरपासून तरुण बेपत्ता, परवेज सहिबोलेचा शोध सुरु

Screenshot

banner 468x60

खेड तालुक्यातील एका तरुणाच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परवेज अन्वर सहिबोले (वय ३६) हे ९ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडले, परंतु ते अद्याप घरी परतलेले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही.


परवेज यांनी त्या दिवशी सकाळी ७ वाजता “भोस्ते मोहल्ल्यात जातो” असे सांगून घर सोडले होते. मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. त्यांचा मोबाईल फोन सुद्धा सतत बंद येत आहे, ज्यामुळे त्यांच्या शोधात अडथळा निर्माण झाला आहे. कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, परंतु परवेज यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.

या घटनेची तक्रार त्यांची पत्नी जुबेदा परवेज सहिबोले यांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
परवेज सहिबोले यांची उंची ५ फूट ९ इंच, रंग सावळा, चेहरा गोल, केस काळे व मध्यम लांबीचे, तसेच मध्यम वाढलेली दाढी आहे. बेपत्ता होण्याच्या वेळी त्यांनी चॉकलेटी चेक्सचा शर्ट, काळी ट्रॅक पॅन्ट, व पावसाळी बूट परिधान केले होते. त्यांच्याकडे रेडमी कंपनीचा

मोबाईल फोन होता. सध्या त्यांच्या पत्नी आणि ११ व १३ वर्षांच्या दोन मुलांवर मोठे मानसिक संकट ओढवले आहे. खेड पोलीसांनी परवेज यांचा शोध सुरु केला असून, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणालाही परवेज यांच्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *