Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

खेड : परशुराम रुग्णालयात शारदीय विरेचन शिबिराचं आयोजन 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत असणार शिबीर

banner 468x60

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचालित एमईएस आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, घाणेखुंट लोटे, यांच्या पंचकर्म विभागातर्फे यंदाही शारदीय विरेचन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सवलतीच्या दरात राबवण्यात येणार आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार पंचकर्म हे शरीरशुद्धीचे महत्वाचे साधन असून त्यातील एक प्रमुख उपचार म्हणजे विरेचन.

हा उपचार गुदमार्गाने शरीरातील दोष बाहेर टाकून शरीराची व मनाची शुद्धी करतो. विशेषतः शरद ऋतूमध्ये विरेचन घेणे आरोग्यास अत्यंत लाभदायक असल्याचे शास्त्र सांगते. म्हणूनच याला ‘शारदीय विरेचन’ असे म्हटले जाते.

विरेचन उपचाराच्या माध्यमातून खालील आजारांवर प्रभावी परिणाम होतो:

पित्त व कफदोषजन्य व्याधी

आम्लपित्त

स्थौल्य (लठ्ठपणा)

त्वचारोग

अजीर्ण, कब्ज

मासिक पाळीचे विकार व PCOD

वंध्यत्व

केस गळणे, केस पांढरे होणे

पक्षाघात आदी व्याधींवर विरेचन प्रभावी ठरते.

आरोग्यदायी जीवनासाठी व विविध व्याधींवर निसर्गोपचारातून उपाय शोधणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर एक उत्तम संधी आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिबिरासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील वैद्यांशी संपर्क साधावा:

वैद्य नयनेश कांबळे – मोबा. ८५५२९९३७४४

वैद्य अक्षदा गुजर – मोबा. ९८५०६१५३५५

संपर्क:
परशुराम हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर,
घाणेखुंट लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी
फोन: ०२३५६ ६६१५०० / ५०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *