Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : बंद दरवाजावर अडकवलेली कुलपाची चावी, दागिने लंपास, लोहारवाडी दापोलीत दिवसाढवळ्या चोरी

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील लोहारवाडी येथे एका घरात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीची घटना समोर आली आहे. अरुणा काताळकर यांच्या घरातील बंद दरवाजावर अडकवलेली कुलपाची चावी वापरून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून अंदाजे १.५ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.

banner 728x90 banner 728x90


ही घटना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत घडली. घरात कोणी नसताना चोरट्यांनी हुशारीने चावी वापरून घरात प्रवेश केला. त्यांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स आणि १ लाख रुपये किमतीचे काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
या घटनेची लेखी तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक निर्मळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. चोरट्यांनी कोणतीही जबरदस्ती न करता, शांततेने घर उघडून चोरी केल्यामुळे घराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


या घटनेमुळे लोहारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसरातील शक्य असलेले साक्षीदार, तसेच चोरीपूर्वी घराच्या आसपास दिसलेल्या अनोळखी व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *