खेडमधील लोटे याठिकाणी एक धक्कदायक घटना घडली आहे. महाराजाच्या नावावर महाराज काय काय करायचा याची काळी बाजू आता समोर आली आहे.
खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. . पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी पोलीस विभागाने तात्काळ दखल घेत गुरुकुलाचा प्रमुख संशयित आरोपी भगवान कोकरे आणि त्याचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती.
याच दरम्यान गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे याने मुलीसोबत अनेकदा अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. याची रत्नागिरी पोलीस विभागाने तत्काळ दखल घेतली . याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात संशयित आरोपी भगवान कोकरे आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता तसेच पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पोस्को अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच BNS 74,351(3) 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भगवान कोकरे यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन भगवान कोकरे यांना अटक करण्यात आली आहे.
खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ., ती मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या संशयित भगवान कोकरे यांनी अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला . केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडीतेने गुरुकुलातीलच एका सदस्याला घटना सांगितली असता , त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस. महाराजांची राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले. तसेच जर कोणाला काही सांगितलेस तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल.
असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनी नंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली व या संदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकाराने समाजात आणि धार्मिक संस्थांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली .
अनेक स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी आरोपीची गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
पीडितेने सुरुवातीला ही घटना गुरुकुलातील एका सदस्याला सांगितली असता, त्याने याबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. “महाराजांची राजकीय ओळख आहे. जर कोणाला काही सांगितले, तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल,” असे सांगून तिला गप्प राहण्यास भाग पाडले.
वारंवार अशा घटना घडत राहिल्याने अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजला.
कुटुंबियांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर खेड पोलिसांनी संशयित आरोपी भगवान कोकरे आणि प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता आणि पोक्सो अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खेड पोलिसांनी तत्पर कारवाई करत संशयित आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धार्मिक संस्थांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने समाजात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींची गंभीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी भगवान कोकरे व प्रितेश कदम याना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















