दापोलीत ‘भगवान’ ‘कृपा’ असलेला ठेकेदार जनतेसाठी “राहू’ची पीडा, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

banner 468x60

दापोली आणि खेड रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेला अनेक वर्षांपासून त्रास आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेलं असून कोणत्याच राजकीय नेत्यांनी याबाबत अजूनही काम करण्याची तसदी घेतली नाही.

दापोली खेड या राज्यमार्गावरबरोबरच दापोली तालुक्यातील अनेक रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली असून अनेक रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली आहे.दापोली तालुक्यातील दापोली – खेड व दापोली-हर्णै आदी रस्त्यावरील खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र या खड्ड्यांना जाबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दापोलीतील काही मर्जीचे ठेकेदार आहेत त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. भगवान कृपेने काही मर्जीतल्याच असलेल्या व नावातच ‘राहू कृपा’ असलेल्या ठेकेदारालाच सगळीच बडी लाखो कोट्यावधी रुपयांची कंत्राट दिली जात आहेत. त्यामुळे सध्या उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. दापोली हर्णै या राज्य मार्गावरती गणपतीत सार्वजनिक बांधकाम कडून दुसर्‍या ठेकेदाराने खड्डे भरण्याचा नाटक करून बिल मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

दापोली शहरापासून अवघ्या तालुक्यात याच बड्या ठेकेदाराला सगळी काम मिळावी यासाठी या बड्या ठेकेदाराला भगवान दादाचा आशीर्वाद असल्याने अनेक जण मूग गिळून गप्प आहेत. दापोली शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आमच्याकडे सध्या कोणतीही ग्रँड नाही त्यामुळे खड्डे भरू शकत नाही असं कारण दिलं जात आहे. इतकेच नाही तर गणेशोत्सवात आम्ही खड्डे भरले त्यामुळे निधी संपला असं खोटं कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सांगत आहेत.


या सगळ्या रस्त्यांवरील खड्डे प्रकरणाला आता दापोलीतील जनता कंटाळली आहे. हे खड्डे भरून रस्ते पूर्ववत करावेत अशी मागणी आता जेष्ठ नागरिक, महिला व नागरिकांकडून होऊ लागली आहे. इतकच नाही तर दापोली शहराजवळील गिम्हवणे येथील गजानन महाराज नगरातील रहिवासी व हर्णैमधील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोट्यावधी रुपयांची लाखो रुपयांची टेंडर मिळवणारा भगवान कृपा असलेल्या ठेकेदाराच्या अरेरावीला मात्र स्थानिक ठेकेदार व कार्यकर्ते कंटाळले आहेत. भगवान कृपा असल्याने हा ठेकेदार सध्या तालुक्यात येणारी सगळी कोट्यावधी लाखो रुपयांची कंत्राट फक्त आपल्यालाच मिळावी त व आपणच सगळेच करणार आहोत अशा थाटात वावरत आहे.

मात्र बोलणार कोण त्यामुळे अनेक जण मूग गिळून गप्प आहेत. आज बडा ठेकेदार कोणाला कोणती काम द्यायची हे ठरवतो इतकच नाही तर काम करता नाही अनेक नियम धाब्यावर बसवून काम केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *