चिपळूण : रत्नागिरी जिल्हा ठेकेदार संघटनेतर्फे चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचा सत्कार

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा ठेकेदार संघटनेतर्फे चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमचा विशेष सत्कार करण्यात आला.
मंडणगड येथे विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या तालुका न्यायालयीन इमारत बांधकामाच्या यशस्वी पूर्णतेबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी असलेल्या मंडणगड तालुक्यात न्यायालयीन कामकाजासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे, तत्कालीन मा. न्यायमूर्ती भूषण गवई (सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी भूमिपूजन पार पडले.

मंडणगड तालुका हा अतिदुर्ग आणि अतिवृष्टीप्रधान भाग असल्यामुळे हे काम पूर्ण करणे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी मोठे आव्हान होते.
सदर न्यायालयीन इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ५०,३८३ चौ. फूट असून, दोन वर्षांच्या मुदतीतील हे काम फक्त १० महिन्यांत पूर्ण करण्यात आले — ही विक्रमी कामगिरी ठरली.

१२ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या भव्य न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. इमारतीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि प्रेरणादायी भित्तीचित्रे सुद्धा उभारण्यात आली असून, अशा प्रकारची न्यायालयीन इमारत भारतामध्ये पहिल्यांदाच तालुकास्तरावर उभारली गेली आहे.

या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत आदी मान्यवरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केले.

त्याबद्दल चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर ठेकेदार संघटनेतर्फे
कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव,
मंडळ अधिकारी मिलिंद कुलकर्णी,
उपअभियंता प्रमोद कदम,
जठार मॅडम, वास्ते व सहकारी कर्मचारी
यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *