शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थापक व अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, बेडशीट आणि दीपावली निमित्त पणती वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आश्रम शाळेचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी, मुख्याध्यापक आनंद कर्पे, शिवस्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत खांबळ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शिवसंघर्ष संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले.


कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी, सचिव प्रीती गुरव, सदस्य . अविनाश साटले, . रोहित बेंडल, आणि अभिजित गोसावी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. संस्थापक/अध्यक्ष मयुर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शालेय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्र गीताच्या तालावर कार्यक्रमाचा समारोप झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















