रत्नागिरी : मनुज जिंदल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

banner 468x60

नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची बदली करण्यात आली होती.


देवेंद्र सिंह यांच्या जागी मनुज जिंदल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिंदल यांनी गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ​अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्यचा अंक देवून त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *