दापोली : पूज्य साने गुरुजी पालगड विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

banner 468x60

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर, पालगड (साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी संचलित) विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हा विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला. विजेत्या संघाला आता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्पर्धेत करण्याची संधी मिळणार आहे.

शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथे या स्पर्धा पार पडल्या. मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करून अंतिम फेरीत विजय मिळवला. संघाचे नेतृत्व कुमारी मान्यता गौरत हिने केले. वृद्धी चव्हाण, रिया गणवे, मनस्वी जामकर, आकांक्षा मोहिते, निधी कोशिमकर, देवयानी गोलीपकर व नंदिनी कोशिमकर यांनी चमकदार कामगिरी केली.

मुलांच्या संघाचे नेतृत्व आराध्य निवाते याने केले. रुद्र शिंदे, आर्यन गुरव, श्रवण भोसले, श्लोक केसरकर, सक्षम पिंपळकर, सम्यक मोहिते, स्वराज दळवी व मंथन कलमकर यांनी प्रभावी खेळ करत उपविजेतेपद पटकावले. संघांना. मंजिरी शितुत व. दत्तप्रसाद गुरव यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात कुमारी श्रद्धा गणपती निकम हिने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावून शाळेचा गौरव वाढवला.

शाळेचे मुख्याध्यापक. प्रसाद पावशे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . शरद रावजी केळकर, उपाध्यक्ष डॉ.. अशोक करंदीकर, सचिव डॉ. मकरंद करमरकर व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *