दापोली नगर पंचायत व टाळसुरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता नवा नगरजवळील विलास माने यांच्या घराच्या मागे त्यांच्या पत्नी काही कामानिमित्त गेल्या असता, केळीच्या झाडामागून अचानक बिबट्या दिसून आला.

बिबट्याने चाहूल लागताच घराबाहेर असलेल्या दोन मांजरांवर झडप घातली. प्रसंगावधान राखून त्यांनी तत्काळ घरामध्ये पळत जाऊन दरवाजा लावला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नवा नगर व टाळसुरे हद्दीतील ग्रामस्थांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















