Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : घरकुल योजनेच्या वादातून वृद्धाला मारहाण, हात आणि पाय मोडला, रामचंद्र मोरेवर गुन्हा दाखल

banner 468x60

घरकुल योजनेच्या वादातून गुहागर तालुक्यातील हेदवी-हेदवतड मोरेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे दोन्ही हात आणि एक पाय मोडले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घडलेली घटना अशी की, फिर्यादी एकनाथ गोविंद मोरे (वय ५५) हे आपल्या घराबाहेर असताना त्यांचे चुलत भाऊ आणि भावजय असलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने आरोपींच्या घरकुल योजनेला विरोध करणार असल्याचे बोलले, याच रागातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.


दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एकनाथ मोरे घरी एकटे असताना, आरोपी रामचंद्र महादेव मोरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका महिलेने त्यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. ‘तुला ठार मारून टाकतो,’ अशी धमकी देत लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, पाठीवर, छातीवर, दोन्ही हातांवर आणि पायांवर जबर मारहाण केली. या हल्ल्यात एकनाथ मोरे यांचे दोन्ही हातांची हाडे आणि डाव्या पायाचे हाड मोडले. तसेच, त्यांच्या उजव्या पायाला आणि डोळ्याच्या भुवईवरही गंभीर दुखापत झाली आहे.


या घटनेनंतर, जखमी एकनाथ मोरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११८(२), ३५२, आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घरगुती वादातून झालेल्या या गंभीर गुन्ह्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *