गुहागर : 9.5 लाख रुपयांचे सोलर पॅनल चोरीला

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील जानकी फार्महाउसवर ठेवलेले विक्रम सौरऊर्जा कंपनीचे तब्बल ९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ४५ सोलर पॅनल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


​गणेश यशवंत साळवी (वय ५६, मूळ रा. ठाणे) यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही चोरी झाली. फार्महाउसच्या मोकळ्या व्हरांड्यात ठेवलेले ४५ सोलर पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. प्रत्येक पॅनलची किंमत २१,००० रुपये इतकी आहे.


​या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीमागे कोणी अज्ञात व्यक्ती आहे की, या चोरीत आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


​या चोरीमध्ये रिसॉर्टच्या बांधकामासाठी ठेवलेले सोलर पॅनल चोरले असावेत असा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *