गुहागर : चिखलीमध्ये गळफास घेत युवकाची आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील चिखली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल गोपाळ कानसे (वय ३५, रा. चिखली मांडवकरवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
​ही घटना १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानसे याने चिखली येथील औकार मंगल कार्यालयाच्या किचनमधील सीलिंग फॅनच्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला.


​या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *