Breaking News
दापोली : दसऱ्यानिमित्त दापोलीत ऑनलाइन भोंडला स्पर्धा, दशानेमा गुजर युवक संस्थेचा उपक्रम, दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील महिलांना सहभागाची संधी चिपळूण : डी.बी.जे. कॉलेजसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसवा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी युवासेनेची मागणी, जुने गतिरोधक सपाट झाल्याने अपघाताचा धोका; राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन चिपळूण : शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर चिपळुण : गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 48 हजारांचा मुद्देमाल नष्ट रत्नागिरीत नात्याला काळिमा, मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार, तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

गुहागर : बेपत्ता तरुणाचा मृतदेह जेटी किनारी आढळला; परिसरात खळबळ

banner 468x60

गुहागरमधून काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कारूळ विसापूर (बौद्धवाडी) येथील नितिन जगन्नाथ पवार (वय ३०) या तरुणाचा मृतदेह काल १७ सप्टेंबर २०२५ सकाळी त्रिशूल साखरी (ता. गुहागर) येथील जेटीच्या किनारी पाण्यात उपड्या स्थितीत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नितिन पवार यांना गेल्या काही वर्षांपासून गंभीर स्वरूपाची कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्यांच्यावर डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात तीन वर्षांपासून उपचार सुरू होते.

घटनाक्रम:
१२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नितिन घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या परिचितांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र काहीच माहिती मिळाली नाही. परिणामी, १४ सप्टेंबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात नितिन बेपत्ता असल्याची तक्रार (नोंद क्र. १७/२०२५) दाखल करण्यात आली होती.

काल सकाळी उलगडा:
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्रिशुल साखरी येथील जेटीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता, तो नितिन पवार यांचा असल्याचे ओळख पटली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. नितिन यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *