गुहागर : किकबॉक्सिंग निवड चाचणीत सैफ सईद बंदरकरने द्वितीय क्रमांक पटकावला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणीत शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सैफ सईद बंदरकर याने द्वितीय क्रमांक पटकावत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.


सैफने ही ऐतिहासिक कामगिरी क्रीडा शिक्षक हुजैफा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य केली. शाळेत नियमित सराव, चिकाटी आणि जिद्द यांचा सुंदर मिलाफ सैफच्या या यशामागे दिसून येतो.


स्पर्धेच्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू योगिता खाडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सैफला पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


सैफच्या या यशामुळे शाळा, पालक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्गानेही सैफच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


गावातील युवकांसाठी सैफची ही झुंजार कामगिरी प्रेरणादायी ठरणार असून, आता तो राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा ध्यास घेत असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *