गुहागर : 38 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यात एका तरुणाचा अचानक चक्कर येऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुभाष आण्णा पवार (वय ३८) असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील रहिवासी असलेले सुभाष पवार हे सध्या शृंगारतळी बाजारपेठ, गुहागर येथे वास्तव्यास होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास त्यांना गणेश आण्णा पवार यांच्या घराच्या अंगणात अचानक चक्कर आली. ही बाब लक्षात येताच, गणेश पवार यांनी तात्काळ त्यांना गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयातील डॉक्टरांनी सुभाष पवार यांना तपासले. मात्र, तपासणीपूर्वीच सकाळी ८.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अचानक चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *