दाभोळ : फ्रेंडस सर्कल दाभोळला मंगलमूर्ती प्रतिष्ठानकडून उत्तेजनार्थ पारितोषिक

banner 468x60

फ्रेंडस सर्कल दाभोळला मंगलमूर्ती प्रतिष्ठानकडून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आहे.
मंगलमूर्ती प्रतिष्ठान, रत्नागिरी आयोजित मंगलमूर्ती सजावट स्पर्धेत फ्रेंडस सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दाभोळ गुजरआळी (ता. दापोली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.

परीक्षक मंडळाने एकमताने फ्रेंडस सर्कल मंडळासोबत जैतापूरचा राजा उत्सव मंडळ, जैतापूर (ता. राजापूर) यांच्या देखाव्यांची उत्तेजनार्थ बक्षिसासाठी निवड केली.
या पारितोषिकानंतर मंगलमूर्ती प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने फ्रेंडस सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट आणि सन्मानपत्र देण्यात आले.

या प्रसंगी फ्रेंड सर्कलचे मंगेश तांबट यांनी मंडळाच्या वतीने सन्मानपत्र स्वीकारले.
या यशाबद्दल फ्रेंडस सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दाभोळ गुजरआळीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *