चिपळूणकरांसाठी प्रशासन सतर्क – पूरस्थितीवर नियंत्रणासाठी रात्रीही पहारा, नगर परिषदेची 11 पथके तैनात

banner 468x60

चिपळूणमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसिलदार प्रविण लोकरे, उपअभियंता जलसंपदा खोत, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे व तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत प्रांत कार्यालयात नियंत्रण ठेवून आहेत.


नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच काही अडचण निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


याशिवाय चिपळूण नगर परिषदेची ११ पथके शहरातील विविध भागांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीसह तैनात असून, नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.


प्रशासनाचा सतत संपर्क यंत्रणा व मदतकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *