रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनानिमित्त भांबेड येथे शिवसंघर्ष संस्थेच्या वतीने भव्य कार्यक्रम शैक्षणिक साहित्य वाटप, गुणगौरव व सेवानिवृत्ती समारंभाचा उत्साह

banner 468x60

रत्नागिरी लांजा तालुक्यातील भांबेड नं.२ येथील जि. प. प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.


संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अल्पआहार वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच. काशीराम विश्राम चव्हाण सरांचा आदर्श शिक्षक सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत भांबेडच्या सरपंच विनया गांगण मॅडम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुरव, प्रतापराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक इलाही मुलानी,. ऋषिकेश बेर्डे (सहाय्यक शिक्षक), मनिषा देसाई व साधना पाटील (शिक्षिका, जि. प. प्रा. शाळा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.


या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार. स्वप्नील गोसावी, सचिव. प्रीती गुरव, सदस्य. अविनाश साटले,. रोहित बेंडल,. अभिजित गोसावी यांनी उत्तमरित्या पार पाडले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष. मयुर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शालेय वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र गीताने सांगता करत कार्यक्रमाची समाप्ती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *