Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : “जिद्दीला सलाम! ग्रामीण भागातील मुलगा पोहोचला IPS पदावर”

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील माटवण गावातील अक्षय संजय महाडिक (IPS Akshay Mahadik) यांची आग्रा येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
कृषि अधिकारी म्हणून काम पाहिलेले वडील संजय कृष्णा महाडिक आणि जि.प.शाळेवर मुख्याध्यापक म्हणुन काम पाहिलेल्या आई सरोज संजय महाडिक यांनी आपल्या मुलास प्रोत्साहन दिल्याने त्यांचा मुलगा अक्षय संजय महाडिक (IPS Akshay Mahadik) हे आज आयपीएस अधिकारी (IPS) बनले आहे.

अक्षय संजय महाडिक (IPS Akshay Mahadik)

banner 728x90

त्यांच्या या यशोगाथेमुळे माटवण गावचा लौकिक वाढला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अक्षय महाडिक हे युपीएसी (UPSC) 2022 परीक्षेत 212 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये दोन वर्ष प्रशिक्षण पूर्ण करुन 5 आँगस्ट 2025 रोजी अक्षय त्यांची आग्रा येथे सहाय्यक पोलिस आयुक्त केडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे

अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लवेल, ता. खेड, पुढील शिक्षण एल.पी. इंग्लीश स्कुल खेड, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.

माध्यमिक शालांत परीक्षेत ९८.५५ टक्के गुणांसह कोकण बोर्डात प्रथम, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२ वी विज्ञान) ९३.०० टक्के गुण मिळवून प्रशालेत व्दितीय तसेच जेईई परीक्षेत १०७ गुण मिळवून प्रशालेत प्रथम १२ वी उत्तीर्ण होउन पुढे अक्षयने वाशी येथील Father Agnel Engineering या कॉलेज मध्ये शिक्षण घेउन B.E. (Mechanical) ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली येथे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी रवाना झाले होते. ८ ते ९ महिने दिल्ली येथे व नंतर खेड व नेरुळ (नवी मुंबई) येथे

पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करुन पहिल्याच प्रसत्नात देशात २१२ वा क्रमांक पटकावला आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी अक्षय एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण अक्षय यांनी घालून दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


दरम्यान, आपला मुलगा आयपीएस अधिकारी झाल्याने त्याचा आपणांस अभिमान वाटत असून अक्षयनी या पदापर्यंत मजल मारल्याने आमच्या कुटुंबीयांची व गावाचे नाव मोठे केले असल्याचे वडील संजय कृष्णा महाडिक व आई सरोज संजय महाडिक यांनी सांगितले. तर, ग्रामीण तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पहावीत.

त्याला आत्मविश्वास, जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे मत आयपीएस अक्षय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लवेल, ता. खेड, पुढील शिक्षण एल.पी. इंग्लीश स्कुल खेड, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेत ९८.५५ टक्के गुणांसह कोकण बोर्डात प्रथम, उच्च

माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२ वी विज्ञान) ९३.०० टक्के गुण मिळवून प्रशालेत व्दितीय तसेच जेईई परीक्षेत १०७ गुण मिळवून प्रशालेत प्रथम १२ वी उत्तीर्ण होउन पुढे अक्षयने वाशी येथील Father Agnel Engineering या कॉलेज मध्ये शिक्षण घेउन B.E. (Mechanical) ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली येथे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी रवाना झाले होते. ८ ते ९ महिने दिल्ली येथे व नंतर खेड व नेरुळ (नवी मुंबई) येथे पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करुन पहिल्याच प्रसत्नात देशात २१२ वा क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी अक्षय एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण अक्षय यांनी घालून दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


दरम्यान, आपला मुलगा आयपीएस अधिकारी झाल्याने त्याचा आपणांस अभिमान वाटत असून अक्षयनी या पदापर्यंत मजल मारल्याने आमच्या कुटुंबीयांची व गावाचे नाव मोठे केले असल्याचे वडील संजय कृष्णा महाडिक व आई सरोज संजय महाडिक यांनी सांगितले. तर, ग्रामीण तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पहावीत. त्याला आत्मविश्वास, जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे मत आयपीएस अक्षय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *