Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : गेल्या 20 दिवसांपासून 30 वर्षीय तरुण बेपत्ता

banner 468x60

दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील ‘समाली हॉटेल’जवळील लवाटे यांच्या नर्सरीमध्ये काम करणारा स्वप्नील हरिश्चंद्र तांबे (वय ३०) हा तरुण १८ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.

banner 728x90

हा तरुण गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी मोहीम सुरू केली आहे.


बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील हरिश्चंद्र तांबे (वय ३०, दापोली) असे आहे. सकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला पण काहीच माहिती मिळाली नाही. अखेर 4 ऑगस्ट रोजी दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.


अंदाजे उंची ५ फुट ५ इंच,, रंग-सावळा, बांधा मध्यम चेहरा-उभट, डोळे-काळे, केस-काळे, दाढी-वाढलेली, अंगात फुल हाताचे टि-शर्ट त्यावर आडवे पांढरे पट्टे, खाली नेसणीस काळी फुल पॅन्ट, उजवे हाताचे दंडावर इंग्रजीमध्ये स्वप्नील असे गोंदलेले आहे.


याबाबतची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
​स्वप्नील मूळचा फरारे, बौद्धवाडी, ता. दापोली येथील रहिवासी आहे.


दुपारी नर्सरीतून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात उशिरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, स्वप्नील तांबे याचा शोध सुरू आहे. असा व्यक्ती आढळल्यास मो.नं.-९२०९४३११८६ आणि दापोली पोलीस ठाणे मोनं. ७६२०५३२३८७ या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *