चिखलगाव : लोकसाधना संस्थेचा उद्या वर्धापन दिन सोहळा, कौशल्य या विषयावर “कौशल्य साधना” या हस्तलिखिताचं प्रकाशन

Screenshot

banner 468x60

चिखलगाव येथील लोकसाधना संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन कार्यक्रम येत्या १ ऑगस्ट २०२५ ला म्हणजेच उद्या
मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या शुक्रवार १ ऑगस्टला सकाळी ११:०० ते १२:३० ला स्थळ रामकृष्ण सभागृह, लोकसाधना प्रकल्प, मु. पो. चिखलगाव, ता. दापोली याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी डॉ. प्राची साठे यांची उपस्थिती असणार आहे. कौशल्य या विषयावर “कौशल्य साधना” या हस्तलिखिताचं प्रकाशन होणार आहे.


या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, माजी सदस्य, विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *